Saturday , December 14 2024
Breaking News

ऑनर किलिंग; प्रेमी युगुलाचा संशयास्पद मृत्यु

Spread the love

विजापूर : विजापूर जिल्ह्यातील सलाहळ्ळी (ता. देवरहिप्परगी) एकमेकांच्या गावाशेजारी राहणाऱ्या प्रेमी युगुलाचा संशयास्पद मृत्यू झाला असून खून करण्यात आला असल्याचा आरोप घरच्यांनी केला आहे. आंतरजातीय तरुणाशी प्रेम केल्याच्या कारणातून अल्पवयीन मुलीसह तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना सलादहळ्ळी येथे घडली. रिक्षाचालक बसवराज बडगेरी (वय 19, रा. सलादहळ्ळी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तर याच गावाशेजारी असणाऱ्या खानापूर येथील 17 वर्षीय दवलबी बंदगीसाब तंबद या युवतीशी तरुणाचे प्रेम होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात प्रेम होते. दोघेही अंतरजातीय होते. त्यामुळे युवतीच्या कुटुंबीयांकडून या प्रेम प्रकरणाला विरोध झाला होता. असे असले तरी मंगळवारी दोघेही एका ठिकाणी भेटले होते. याबाबतचा सुगावा लागल्यानंतर दोघांचाही दगडाने ठेचून खून करण्यात आला. अल्पवयीन युवतीच्या वडिलांकडून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
युवतीच्या कुटुंबीयांकडून विरोध असतानाही दोघांचे प्रेमप्रकरण सुरूच होते. या कारणातूनच सदर ऑनर किलिंगची घटना घडल्याची बोलले जात आहे. घटना समजताच कलकेरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास हाती घेतला आहे. त्यावेळी तरुणाच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!

Spread the love  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *