Thursday , June 4 2026
Breaking News

निपाणीत घनकचरा वर्गीकरणाला बगल

Spread the love

 

सर्रासपणे नियमांचे उल्लंघन; प्लास्टिक कचऱ्याने गटारी तुंबल्या

निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियमांतर्गत कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांची निपाणी नगरपालिकेने प्रभावी अंमलबजावणीन केल्याने शहरवासीयांनी कचरा वर्गीकरण सक्तीला ठेंगा दाखविला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका आयुक्तांना दंडात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. तरीही नागरिक, व्यावसायिक आस्थापना आणि मोठे कचरा उत्पादक वर्गीकरण न करताच घंटागाड्यांना कचरा देत आहेत. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यानंतर पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे सुलभ होऊन कचऱ्याचे प्रमाण कमी होते. याशिवाय पर्यावरण संरक्षणास मदत होते. पण शहर आणि उपनारातील अनेक कुटुंबे घंटागाड्यांना कचरा न देता शेजारच्या गटारात कचरा टाकत आहेत. तसेच प्लास्टिकचा कचरा आणि बाटल्यांचा खर्च गटारीमध्ये दिसून येत आहेत.
——————————————————————–
‘कचरा वर्गीकरण करून घंटागाड्यांना दिल्यास स्वच्छता व्यवस्थापन अधिक परिणामकारक बनू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातून निर्माण होणारा कचरा चार स्वतंत्र प्रकारांत वर्गीकृत करून घंटागाड्यामध्ये कचरा टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचरा एकत्र दिल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.’
गणपती पाटील, नगरपालिका आयुक्त, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

दहा लाख कि. मी. धावलेल्या भंगार बस रस्त्यावर

Spread the love  प्रदूषणासह प्रवाशांचा जीव टांगणीला निपाणी (वार्ता) : ‘कमी खर्चात आगार चालवायचे आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *