Monday , September 21 2026
Breaking News

स्तवनिधी पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रमातील ‘पारस धर्म’ संस्कार शिबिरास प्रतिसाद

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : १०८ गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्याद्वारे स्थापित श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली संचलित श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम (गुरुकुल) स्तवनिधी (गवाण) येथे ‘पारस धर्म संस्कार शिबिर २०२६’ पार पडले. चार दिवस मोफत झालेल्या या शिबिरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. निपाणी शहर व परिसरातील मराठी आणि कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिरात बालबोध भाग १ व २, रत्नकरंडक श्रावकाचार, विविधयांचे प्रशिक्षण देण्यात आले दररोज पहाटे ५.३० पासून रात्री ९.३० पर्यंत णमोकार मंत्र, योगासने, पूजा, अभिषेक, नैतिक पाठ, शंका समाधान सत्र व वैयक्तिक अभ्यास असे उपक्रम राबविण्यात आले.
संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी, विद्यार्थ्यांना शिक्षणासह धर्म संस्काराचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. विविध खेळ, योगासनामुळे आरोग्य संपत्ती टिकून राहते. त्यासाठी प्रत्येकाने धर्मसंस्कारा सारख्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी वासुदेव गुंडे, राकेश मगदूम, बाहुबली उपाध्ये, धीरज चौगुले यांच्यासह पालक प्रतिनिधी, शिबिरार्थी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *