Monday , September 21 2026
Breaking News

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगावचा बी.फार्म प्रथम सत्राचा निकाल जाहीर

Spread the love

 

बेळगाव : राजीव गांधी युनिव्हर्सिटी आँफ हेल्थ सायन्स, बेंगलोर या विद्यापिठातर्फे घेण्यात आलेल्या बी.फार्म (प्रथम सत्र) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महाविद्यालयातील बगेइरम मुल्ला यांनी 84.5% गुणांसह प्रथम क्रमांक, उम्मेहानी ओलमनी यांनी 82.7% गुणांसह द्वितीय क्रमांक, तर मुबीना डबाडी यांनी 81.8% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू; महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विष्णू कंग्राळकर, प्राध्यापकवर्ग व व्यवस्थापन मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, सातत्य आणि समर्पणामुळे हे यश मिळाल्याचे सांगून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या उत्कृष्ट निकालामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *