Sunday , September 20 2026
Breaking News

मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार, कॅबिनेट मंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याने निपाणीत जल्लोष

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांची तसेच कॅबिनेट मंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याबद्दल बुधवारी (ता.३) येथील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून व मिठाई वाटप करत आपल्या नेत्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल तसेच सर्वसामान्य नागरिक शेतकरी, कामगार, महिला व युवकांच्या हितासाठी प्रभावी नेतृत्व लाभेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, सुजय पाटील, वैभव पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद ,राजेंद्र चव्हाण माजी सभापती किरण कोकरे, दत्त्ता पाटील, नेताजी पाटील, धनाजी चव्हाण, किसन देसाई, संजय कांबळे, धीरज पाटील, युवराज पोळ, जीवन घस्ते, रवी श्रीखंडे, अरुण आवळेकर, प्रशांत नाईक, अल्लाबक्ष बागवान, दीपक ढनाल, मंगल घोरपडे, कल्पना पुजारी, किसन दावने, झाकीर कादरी, प्रतीक शहा, प्रशांत हांडोरी, सुनील हिरकुडे, झुंझार दबडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *