Sunday , July 26 2026
Breaking News

डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

Spread the love

 

मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव; राणी चन्नम्मा चौकात फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप

बेळगाव : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतल्यानंतर बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्साहात विजय उत्सव साजरा केला. युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.

शहरातील काँग्रेस भवन येथे मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शपथविधीच्या क्षणी डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. “डीकेशी जिंदाबाद” आणि “काँग्रेस पक्षाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यानंतर कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकात येथे एकत्र येत भव्य विजय उत्सव साजरा केला. यावेळी मृणाल हेब्बाळकर यांनी वीरराणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कार्यकर्त्यांच्या हातात नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, ज्येष्ठ मंत्री सतीश जारकीहोळी तसेच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या छायाचित्रांचे फलक झळकत होते. काँग्रेसचे ध्वज फडकवत काढलेल्या मिरवणुकीमुळे विजय उत्सवाला अधिक रंगत आली.

यावेळी बोलताना मृणाल हेब्बाळकर यांनी डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासकामांना गती मिळेल, लोकाभिमुख प्रशासन अधिक बळकट होईल आणि सामाजिक न्यायाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनिमित्त बेळगावात साजरा करण्यात आलेला हा विजय उत्सव काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह, पक्षावरील विश्वास आणि नव्या नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षा अधोरेखित करणारा ठरला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *