खानापूर (प्रतिनिधी) : जिल्हा पंचायतीच्या आदेशानुसार खानापूर तालुक्यातील जवळपास ५१ ग्राम पंचायतीना कचरा डेपो उभारण्याची सुचना जिल्हा पंचायत अधिकारीवर्गाने दिला आहे.
मात्र ग्रामीण भागात अनेक समस्या असुन कित्येक ग्राम पंचायतीना सरकरी जागा नाही, गावठान नाही, जागेची समस्या भेडसावित असताना कचरा डेपो सक्तिने उभा करू असा दबाव अधिकारी वर्गाने सुरू केला.
तालुक्यातील जास्तीत जास्त ग्राम पंचायतीनी कचरा डेपो रद्द करण्याचे निवेदन तहसीलदार, तालुका पंचायत अधिकाऱ्यांना दिला आहे.
तरीही कचरा डेपो रद्द करण्यासाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात येत आहे.
कचरा डेपोला तीन एकर सरकारी जमीन अथवा गायरान पाहिजे मात्र प्रत्येक ग्राम पंचायतीला गायरान, गावठाण, सरकारी जागा असने गरजेचे आहे. परंतू गायरान अथवा गावठाण नाही, असलेल्या गावाना जनावराच्या चारण्यासाठी जागा अशा अनेक समस्या आहेत. तेव्हा तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना कचरा डेपो म्हणजे डोके दुखी ठरले आहे.
