बेळगाव : कोरोनासाखळी तोडण्यासाठी बेळगावात शुक्रवार सायंकाळी 7 वाजल्यापासून शनिवार आणि रविवार दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला जाणार आहे. शुक्रवार रात्री 7 ते सोमवार सकाळी 5 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन / कर्फ्यू असणार आहे. याकाळात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बेळगावात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. यानुसार शनिवार आणि रविवार दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन बाबत डीसीपी विक्रम आमटे यांनी माहिती दिली.
या विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार? काय बंद?
काय सुरु? सकाळी 6 ते दुपारी 2 : जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, किराणा मालाची दुकानं, भाज्यांची दुकानं, फळविक्रीकेंद्र, रेशन दुकानं, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी यांच्यासह सर्वप्रकारची अन्नधान्य विक्री केंद्र (यामध्ये चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी, मासे विक्रेत्यांचा समावेश आहे), शेतमालाशी निगडीत खरेदी-विक्री केंद्र, पाळीव प्राण्यांचे अन्नविक्री केंद्र, पावसाळी हंगामाच्या दृष्टीने आवश्यक वस्तूविक्री केंद्र सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेपुरतीच खुली राहतील.
वैद्यकीय सेवा दुकाने व बाजारपेठा
दूध व्रिक्री व पुरवठा इ.
हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट (प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील.) शनिवार आणि रविवार केवळ पार्सल सेवा देता येणार आहे
दारू विक्रीची दुकाने – सकाळी 6 ते दुपारी 2 (फक्त पार्सल)
पेट्रोल पंप, गॅस एजन्सी
सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (खाजगी व शासकीय), रिक्षासह इ.
उद्योग व कारखाने (अत्यावश्यक कारखाने व उत्पादन करणारे युनिट 247) बँक व पोस्ट सेवा संदर्भात त्यांचे नियमानुसार सेवा सुरू ठेवण्यास मुभा राहिल. नोंदणीकृत पद्धतीने विवाहास परवानगी असेल. (40 जणांना) अत्यावश्यक सेवेतील राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी (247)
अनावश्यक वस्तुंची दुकाने आणि कार्यालये बंद राहतील
इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का? नाही.
दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील? नाही.