Sunday , July 26 2026
Breaking News

हिवाळी अधिवेशन हे सिद्धरामय्यांचे शेवटचे अधिवेशन ठरणार : बी. वाय. विजयेंद्र

Spread the love

 

बेळगाव : हिवाळी अधिवेशन हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे शेवटचे अधिवेशन ठरणार आहे. याशिवाय, मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मुख्य आरोपी आहेत, असे विजयेंद्र यांनी स्पष्ट केले.

बेळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्य सरकारकडे निधीचा तुटवडा आहे, आणि त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आमदारांना निधी देणे अवघड जात आहे. आमच्याकडे 66 आमदार आहेत, परंतु काँग्रेस आमच्यावर निराधार आरोप करत आहे. काँग्रेसने भाजपावर 50 ते 100 कोटी रुपयांच्या आमदार खरेदीसाठी ऑफर देण्याचा आरोप केला आहे, हे आरोप खोटे असून काँग्रेसमधील आमदारच निधीमुळे नाराज असल्याचे ते म्हणाले.

बी. वाय. विजयेंद्र पुढे म्हणाले, हिवाळी अधिवेशनात आम्ही सरकारला अडचणीत आणण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. सरकारने कित्तूर कर्नाटक आणि उत्तर कर्नाटकाकडे दुर्लक्ष केले आहे. राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत एनडीएचे उमेदवार तिन्ही जागांवर विजय मिळवतील, असा विश्वास विजयेंद्र यांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *