बेळगाव : स्वातंत्र्य सैनिक भवन टिळकवाडी येथे कोरोना संकटामध्ये काम नसलेल्या गरीब गरजु कुटुंबाना आहार किटचे वाटप प्रोत्साह फाऊंडेशनच्या देण्यात आले.
मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचे कार्य आम्ही फाऊंडेशनच्यावतीने बेळगांवमध्ये सतत राबविण्यात येत आहे, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमनी कार्यक्रम प्रसंगी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी होते.
या कार्यक्रमास आलेल्या गरीब कुटुंबाना सामाजिक कार्यकर्ते संतोषराव भेंडीगेरी, सुभाषराव होनगेकर, संतोष होंगल, सागर कित्तुर, हिरालाल चव्हाण, रवि होंगल, शंकर कांबळे यांच्या हस्ते आहार किट वितरण करण्यात आले.
संतोष होंगल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सागर कित्तुर यांनी आभार मानले. शेवटी वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.