बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे शास्त्रीनगर येथील डॉ. सुरेश रायकर, त्यांचे चिरंजीव डॉ. अमित सुरेश रायकर आणि नाथ पै सर्कल शहापूर येथील डॉ. रवी मुनवळ्ळी यांचा आज ‘डॉक्टर्स डे’ निमित्त सत्कार करण्यात आला.
बेळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी डॉ. रायकर आणि डॉ. मुनवळ्ळी यांच्या दवाखान्यात जाऊन त्यांना सन्मानित केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि उपशहर प्रमुख राजकुमार बोकडे यांनी शाल व श्रीफळ देऊन तीनही डॉक्टरांचा सत्कार केला. कोरोना प्रादुर्भाव काळात सदर डॉक्टरांनी एकही दिवस दवाखाना बंद न ठेवता नियमांचे पालन करून रुग्णसेवा सुरू ठेवली आहे. दररोज 150 ते 200 नागरिकांवर त्यांच्याकडून माफक दरात उपचार केले जात आहेत. तसेच गरजूंना कांही इतर मदत लागल्यास त्याचीही पूर्तता ते करत आहेत. आजाराची भीती न घालता नागरिकांचे मनोबल वाढविण्याचे काम या डॉक्टरांकडून केले जात आहे.
एकंदर कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल उपरोक्त तीनही डॉक्टरांचा शिवसेनेने आज ‘डॉक्टर्स डे’ निमित्त गौरव केला. याप्रसंगी शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजू तुडयेकर, विनायक जाधव, प्रदीप सुतार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.