कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : आजच्या युगात मोबाईल म्हणजे श्वास व ध्यास झाला आहे. परंतु मोबाईल व संगणक वापरताना पुरेशी माहिती नसल्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळेच आपण सायबर साक्षर होणे आवश्यक आहे.
दैनंदिन जीवनामध्ये इंटरनेट बँकींग, ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन गेम्स, मनोरंजन, शिक्षण, ऑनलाईन संवाद, सोशल माध्यम याकरिता करीता इंटरनेटशी संबध येतो. त्यामुळे त्याचा वापर होताना पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे.
इंटरनेटवरील फिशिंग, वैवाहिक विषयक साईटवरील फसवणूक, ओळख, चोरी, फोटोमधील फेरबदल, बँकांसंदर्भातील फसवणूक, बालकांसंदर्भातील पोर्नोग्राफी, ऑनलाईन गेमिंग, खोटी माहिती देणारी संकेतस्थळे, मानहानी यांची माहिती व यापासून प्रतिबंधात्मक उपाय यासह सायबर गुन्ह्यासंदर्भातील कायदे समाजमाध्यम (सोशल मीडिया) वापरण्यासंदर्भातील घ्यावयाची काळजी घेणे आवश्यक आहे.
गडहिंग्लज उपविभागामध्ये डी.वाय.एस.पी गणेश ईगळें यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जुलै २०२१ ते ११ जुलै २०२१ पर्यंत सायबर गुन्हेबाबत जनजागृतीपर अभियान राबविण्यात येत आहे.