खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुस्तीगीर संघटनेच्यावतीने कोरोनाच्या महामारीत गेल्या दोन वर्षापासुन कुठेच कुस्तीचा आखाडाच झाला नाही. अशाने कुस्तीपटूनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. कुस्तीपटूना खुराक मिळण्याचीही समस्या निर्माण झाली. आर्थिक संकट आल्याने त्यांना मदत व्हावी. यासाठी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचावतीने तिर्थकुंडेत (ता. खानापूर) येथे खुराक किट व प्रमाणपत्र देऊन कुस्तीपटूचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील होते.
कार्यक्रमाला कॅप्टन चांगापा विष्णु पाटील शिवोली, उद्योजक पप्पू होनगेकर, कार्याध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, सेक्रेटरी संजू भोसले, हणमंत गुरव, दिलीप पवार संस्थापक कुस्तीगीर संघटना खानापूर, सेक्रेटरी रमेश पाटील, अभिलाष देसाई, अर्जून जांबोटी, सत्यापा मुत्तेनट्टी, वस्ताद कृष्णा बिर्जे, तातोबा खामकर, रामचंद्र बाळेकुंद्री, मधू पाटील कसबा नंदगड, प्रकाश मजगावी, ग्राम पंचायत सदस्य रामलिंग मोरे, गीता जांबोटी, सखुबाई पाटील, वाळेश पाटील, निवृत्ती मासेकर, जोतिबा खानकर उपस्थित होते.
Check Also
मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे
Spread the love खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच …