खानापूर : यंदाही गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील मारूती मंदिरात डेंगू चिकूनगुनिया लसीकरण पार पडले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य आणि सामजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांच्याहस्ते मोहिमेला प्रारंभ झाला. गावातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गेल्या वर्षी आणि यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आर्सेनिक अल्बम 300 या गोळ्यांचे वितरण त्यांचबरोबर पूर्ण गाव निर्जंतुकिकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली.
तसेच यंदाही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरोघरी जाऊन गावातील नागरिकांचे ऑक्सिजन लेवल आणि आरोग्य तपासणी केली होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी फायदा झाला. यावेळी डेंगू चिकूनगुनियाची लस देण्यात आली. जुलै महिन्यामध्ये डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे डेंगू रुग्ण संख्या वाढू नये त्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून ही मोहीम राबविली गेली. उद्यापासून पूर्ण गावात वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केले जाईल. मारुती मंदिर येथे पार पडलेल्या लसीकरण कार्यक्रमाला जोतिबा यल्लारीचे, पीकेपीएस संचालक विनोद कुंभार, मारुती मुचंडी, परशराम कुंभार, जोतिबा सुतार, कल्लापा लोहार, सुरज पाटील, सतीश पाटील, प्रणव देसाई, ज्ञानेश सुतार, प्रकाश सिधानी, संजू सिद्धांनी, संजू भेंडीगिरी, चेतन कुंभार, रुपेश कुंभार, सोमनाथ पाटील, संगप्पा कुंभार, विठ्ठल लोहार, साई कुंभार सह युवावर्ग उपस्थित होता.
