Monday , September 21 2026
Breaking News

खडेबाजार पोलिसांची मटका अड्ड्यावर धाड; एक आरोपी अटकेत

Spread the love

 

बेळगाव : खडेबाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने मटका जुगार विरोधात कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी सदाशिवनगर येथील कार्तिक प्रल्हाद होळेन्नवर (वय ३०) हा बसवण गल्लीतील बंगी बोळ परिसरात सार्वजनिक ठिकाणी अंकांवर पैसे लावून ओसी (मटका) जुगार चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खडेबाजार पोलीस ठाण्याचे पीएसआय आनंद आदगोंड व त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान आरोपीकडून रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान मटक्यातून जमा झालेली रक्कम सुनील तहसीलदार, रा. खासबाग, बेळगाव याच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९/२०२६ नोंद करण्यात आला असून कर्नाटक पोलीस कायदा कलम ७८(३) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई करणारे पीएसआय आनंद आदगोंड आणि त्यांच्या पथकाचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *