खानापूर : तालुका पंचहमी हमी योजनांची मासिक बैठक बुधवारी (ता. ३) तालुका पंचायत सभागृहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. योजनेचे कार्यदर्शी रमेश मेत्री उपस्थित होते. यावेळी पंचहमी योजनांच्या विविध विभागीय अधिकाऱ्यांकडून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी यांचे स्वागत आणि मागील अहवाल वाचन व्यवस्थापक श्रीकांत सपटला यांनी केले.
यावेळी बोलताना सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले की आम्ही योजनेची बैठक निरंतर होत असेल बेळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या समितीचा विशेष करून कौतुक होत आहे. पंच हमी योजने मार्फत तालुक्याचे विकास साधण्यासाठी आपण सर्वांनी सहकार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
बस व्यवस्थापक संतोष बेनकनकोप यांनी मे महिना मध्ये एकूण ९,६३,३३२ प्रवाशांनी प्रवास केला असून डेपोला ३ कोटी ४३ लाख ९९ हजार ९९० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. महिलांसाठीच्या ‘शक्ती’ योजनेलाही मोठा प्रतिसाद मिळत असून मे महिन्यात ६,३७,१३३ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला. तसेच १४ बस चालक आणि वाहक कमी असल्याने बस वाहतूक सुरळीत होण्यास अडचण होत असून याबाबत पाठ पुरावा करत आहेत., यावेळी इदलहोंड, सागिनकोप, माळअंकले , तसेच बिडी कित्तूर सकाळी बस सुरू करा तसेच पाली हेमडगा साठी बस सुरू करा. शाळा सुरू झाल्या असून बसवाहतूक सुरळीत करा असे त्यांना सूचित केले.
गृहलक्ष्मी योजनेसंदर्भात असिस्टंट सीडीपीओ शारदा मराठे यांनी मे २०२६ अखेरपर्यंत एकूण ६७,३६० अर्जांची नोंदणी झाली असून त्यापैकी ६४,३११ लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे.फेब्रुवारी पर्यंत दिले आहे.
योजनेच्या अंमलबजावणीत केवळ २५ प्रकरणे प्रलंबित असून २१४ प्रकरणांमध्ये संबंधित तांत्रिक अडचणी आढळून आल्या आहेत.
शिधापत्रिका आकडेवारीनुसार एकूण १७६८ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ९८६ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ४२० अर्ज नाकारण्यात आले असून ३६२ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. तालुक्यात सक्रिय रेशन कार्डांची संख्या ८३,६७३ इतकी आहे.
युवा निधी बाबत अधिकारी गुरू हिरेमठ बोलताना म्हणाले की उच्च शिक्षण आणि नोकरी साठी गेल्यावर सदर निधी बंद होतो. सदर योजना फक्त दोन वर्षांकरिता आहे. विद्यार्थी सहा वर्ष कर्नाटकात शिक्षण घेणे गरजेचे आहे. युवा निधी बाबत १३० युवकाचे अर्ज पेंडिंग आहेत. तसेच गावातून जनजागृती करणे आवश्यक आहे.
प्रकाश मादार यांनी बोलताना म्हटले की पंच हमी योजना समिती वतीने नूतन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे अभिनंदन करतो. तालुक्यात पाऊस जास्त असल्याने रस्त्याची सोय होणे गरजेचे आहे. गृह लक्ष्मी योजने अंतर्गत जीएसटी, मूर्त झाले आहेत त्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम सरकारी खात्यावर जमा करण्यासाठी प्रयत्न करा. जे धान्य पुरवठा सुरू आहे. त्याची मुदत संपली आहे का पहा. तसेच अन्न भाग बाबत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नवीन रेशन, मूर्त व्यक्ती, पुरवठा, साठा याबाबत योग्य माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे सदर विभाग सरकारचे नुकसान करत आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करावे अशी मागणी केली.
अन्नभाग्य योजनेबाबतअन्नभाग्य योजनेबाबत अन्न निरीक्षक उदय खातेदार व यमकनमर्डी यांनी माहिती देताना नवीन रेशनकार्ड व रद्द बाबत माहिती दिली. यावेळी दीपा पाटील यांनी ५० किलो मध्ये ३ किलो कमी मिळत आहे. त्याच्यावर कारवाई झाली नाही. तसेच दोन वेळा अंगठा घेण्यात येत आहे. सरकारी नोकरांना बीपीएल कार्ड वर रेशन दिले जात आहेत.
याबाबत ईओ रमेश मेत्री यांनी याबाबत सदर अधिकारी यांना जाब विचारला आणि माहिती देण्याचे सांगितले आहे. तसेच रेशन आणि काळाबाजार इतर समस्या बाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रेशन दुकानदारांना याबाबत मृत व्यक्ती आणि विवाह झालेला बाबत माहिती घेण्यासाठी सूचना करण्यात आले.
गृह ज्योती माहिती देताना प्रवीण बारगाले यांनी सांगितले की तालुक्यात ९८.४ टक्के या योजनेचा लाभ घेत आहेत. यावेळी पाऊस जास्त असल्याने खराब खांब काढून टाकण्याचे काम सुरू आहे. हलशी येथे उप केंद्र बाबत नवीन कंत्राटदार देण्यात येणार आहे. तसेच काही अरण्य विभागाचे अडचण असून याबाबत पाठ पुरावा सुरू आहे. बैलूर येथे उप केंद्र बाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस गॅरंटी योजनेचे सदस्य प्रकाश मादार, बाबू हत्तरवाड, इसाखान पठाण, जगदीश पाटील, रुद्राप्पा पाटील, गोविंद पाटील, युसुफ हरगी, प्रियांका गावकर, दीपा पाटील, शांताराम गुरव, राजा कुडाळे, विवेक तडकोड, संजय गावडे, योजनेचे कार्यदर्शी रमेश मेत्री आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta