Sunday , September 20 2026
Breaking News

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांना महत्त्वाचे आवाहन करत ई-केवायसी प्रक्रियेसाठी कोणत्याही रेशन दुकानदाराला एक रुपयाही देऊ नये, असे स्पष्ट केले आहे.

सध्या खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया शासनाकडून पूर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्याचा अधिकार दुकानदारांना नसल्याचे त्यांनी सांगितले.

रेशन कार्डधारकांनी ई-केवायसीच्या नावाखाली कोणत्याही दुकानदाराला पैसे देऊ नयेत. ई-केवायसी न झाल्यास संबंधित रेशन कार्डधारकाचा रेशन कोटा दुकानदाराला मिळत नाही. त्यामुळे दुकानदारांनी कोणतेही शुल्क न घेता सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जर एखादा रेशन दुकानदार ई-केवायसीसाठी पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले, तर संबंधित दुकानदाराचा परवाना (लायसन्स) रद्द करण्याची कारवाई करण्याची शिफारस करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, पैसे देऊन ई-केवायसी करून घेतल्याचे आढळल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करून शासनाकडे आवश्यक शिफारस करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

तालुक्यातील नागरिकांनी जागरूक राहून गावात कोणताही रेशन दुकानदार ई-केवायसीसाठी पैसे मागत असल्यास त्याची माहिती गॅरंटी योजनेच्या अध्यक्ष किंवा सदस्यांना तातडीने द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गॅरंटी योजनेच्या वतीने सर्व रेशन कार्डधारकांनी आपल्या हक्काच्या सेवेसाठी कोणतेही शुल्क न भरता मोफत ई-केवायसी करून घ्यावी आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *