Monday , September 21 2026
Breaking News

बहिर्जी शिरोळकर पदवीपूर्व महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय, हंदिगनूर येथे अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच पार पडला. शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुऱ्हाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री. विक्रम पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सहसचिव श्री. पी. पी. बेळगावकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष श्री. नारायण पाटील व श्री. हिरोजी पाटील, तसेच कमिटीचे सदस्य श्री. गंगाधर पाटील, श्री मल्लाप्पा एन. पाटील, श्री. पुंडलिक बेळगावकर, श्री शिवराज हुद्दार तसेच सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जी. एस. पाटील व प्राचार्य श्री. एस. एस. मोहिते हे व्यासपीठावर उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या विषयामध्ये उत्कृष्ट निकाल लावलेल्या प्राध्यापकांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी वार्षिक परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या गुणवंत विद्याथिनी कुमारी रसिका कल्लाप्पा वर्पे व कुमारी ममता सदाशिव कांबळे यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
संस्थेचे सचिव श्री. विक्रम पाटील यांनी विचार मांडताना, आजच्या तांत्रिक व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सामाजिक कौशल्य यांच्या विकासावर भर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान मिळविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. संस्थेचे सहसचिव श्री. पी. पी. बेळगावकर यांनी आपले विचार व्यक्त केले. शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुऱ्हाडे यांनी अध्यक्षीय भाषण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस व्ही कांबळे यांनी केले तर प्राध्यापक अनिल कांबळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *