Sunday , September 20 2026
Breaking News

कर्ले माध्यमिक विद्यालयाला वाॅटर फिल्टरची भेट

Spread the love

 

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे, माध्यमिक विद्यालय कर्ले या प्रशाळेला वाॅटर फिल्टर भेट देऊन विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले
योग प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. एम.पी मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविले.
अध्यक्ष वाय पी नाईक यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक पी आर सांबरेकर यांनी प्रास्ताविक करुन महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फेविविध उपक्रम राबविले जातात विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विधायक प्रेरणादायी कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले
याप्रसंगी वाय पी नाईक यांचा शाल, सन्मान चिन्ह, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
तसेच महात्मा गांधी संस्थेच्या वतीने यल्लापा बुरुड, सौ.के एम सातेरी, मुख्याध्यापक पी आर सांबरेकर यांचाही शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले गेले समर्पक उत्तरे देणा-या विद्यार्थ्यांना श्यामची आई हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर वाय पी नाईक, गोपाळराव देशपांडे, यल्लापा बुरुड, पी.एस. मोरे, सौ पी.पी.डेळेकर, पी.के शेळके, लक्ष्मण जाधव, मुख्याध्यापक पी आर सांबरेकर आदी मान्यवर उपस्थित होते
महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे यापूर्वी कावळेवाडी प्राथमिक शाळेला, बिजगर्णी हायस्कूल ला वाॅटर फिल्टर ची सोय करून दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे, तसेच बौद्धिक क्षमता विकसित व्हावी, यासाठी मोफत पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देणे, आवश्यक त्यावेळी स्पर्धा आयोजित करून प्रेरणा देण्याचे सामाजिक कार्य ही संस्था सातत्याने आठ वर्षे करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले
सूत्रसंचालन सौ. के. एम. सातेरी यांनी केले आभार शिक्षक के.जी मेणसे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *