Monday , September 21 2026
Breaking News

पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर उद्या

Spread the love

 

बेळगाव : पाळीव प्राण्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शुक्रवार, दि. 5 जून रोजी मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अनगोळ मेन रोड येथील हरी ओम अपार्टमेंटमधील पेट क्लिनिकमध्ये होणार आहे.

शिबिरामध्ये पशुवैद्यकीय तज्ज्ञांची टीम पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी करणार असून आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शनही देणार आहे. पाळीव प्राण्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन घेण्याची संधी यावेळी उपलब्ध होणार आहे.

या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८०८८९०६०९० या क्रमांकावर संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *