Monday , September 21 2026
Breaking News

आदित्यराज कॅपिटल प्रा. लि.वर धाड; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू

Spread the love

 

बेळगाव : ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपांवरून बेळगाव शहरातील भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेवर गुरुवारी प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी शरण नायक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संस्था कोणत्याही सरकारी नियमांचे योग्य पालन न करता आणि आवश्यक परवानग्यांशिवाय नागरिकांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारत असल्याचा आरोप आहे. तसेच ठेवीदारांकडून जमा झालेल्या निधीचा गैरवापर होत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणी संस्थेविरोधात केपीआयडी (KPID) आणि बड्स (BUDS) कक्षात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेत प्रशासनाने भाग्यनगर येथील कार्यालयावर छापा टाकून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली.

कारवाईदरम्यान टिळकवाडी पोलिसांनी आवश्यक बंदोबस्त ठेवला होता. अधिकाऱ्यांनी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची, ठेवीदारांच्या पैशांच्या व्यवस्थापनाची तसेच नियमांचे पालन करण्यात आले आहे का याची सखोल चौकशी सुरू केली आहे.

कागदपत्रांची छाननी आणि पुढील तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *