Monday , September 21 2026
Breaking News

राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये सीबीआयची चौकशी; आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची पडताळणी

Spread the love

 

बेळगाव : देशातील सहा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलपैकी एक असलेल्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेळगाव येथे कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांप्रकरणी सीबीआय पथकाने बुधवारी चौकशी केली. उपअधीक्षक (डीएसपी) यांच्या नेतृत्वाखालील सुमारे १२ अधिकाऱ्यांचे पथक तसेच लष्करी गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळेला भेट देत विविध नोंदींची तपासणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील खरेदी प्रक्रियेमध्ये कथित अनियमितता तसेच गेल्या काही वर्षांतील निधीच्या संभाव्य गैरवापराबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे माजी विद्यार्थी मंजूनाथ बनशंकरी यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीमध्ये शाळेच्या गेल्या पाच ते आठ वर्षांतील आर्थिक व प्रशासकीय कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्याची, नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) यांच्याकडून लेखापरीक्षण करण्याची तसेच आर्थिक नोंदी सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सीबीआयने प्राथमिक तपास सुरू केल्याचे समजते.

या पार्श्वभूमीवर सीबीआयने प्राथमिक स्तरावरील तपास सुरू केल्याचे समजते. चौकशीदरम्यान विविध कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि खरेदी प्रक्रियेशी संबंधित माहितीची पडताळणी करण्यात आली. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील अधिक तपशील आणि पुढील कारवाईबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या चौकशीमुळे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या प्रशासनात खळबळ उडाली असून, तपासाच्या निष्कर्षांकडे माजी विद्यार्थी, पालक आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *