Monday , September 21 2026
Breaking News

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मानले आभार

Spread the love

 

बंगळुरू : माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गुरुवारी बंगळुरूमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांच्या मंत्रिमंडळात तीन वर्षे मंत्री म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, शोषित, वंचित आणि गरीब घटकांचा आवाज बनून लोकाभिमुख प्रशासन देण्याचे श्रेय सिद्धरामय्या यांना जाते. त्यांच्या दूरदृष्टीच्या योजना, सामाजिक न्यायाप्रती असलेली बांधिलकी आणि प्रशासनाची कार्यपद्धती ही सर्व लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

“आपल्या मार्गदर्शनाखाली जनसेवा करण्याचे भाग्य मला लाभले, हे माझे सौभाग्य आहे. यापुढेही आपले अनुभवी नेतृत्व आणि आशीर्वाद आमच्यावर कायम राहावेत,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *