Thursday , June 4 2026
Breaking News

श्री ब्रह्मचैतन्य रुग्ण सेवा फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या श्री ब्रह्मचैतन्य रुग्ण सेवा फाउंडेशनच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच आराम हॉटेल शेजारी, वेंगुर्ला रोड, हिंडलगा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड उपस्थित होते. तसेच रामचंद्र कुद्रेमनीकर (माजी तालुका पंचायत व ग्रामपंचायत सदस्य, हिंडलगा), अशोक कांबळे (माजी ग्रामपंचायत सदस्य, हिंडलगा), चेतना अगसगेकर (माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष व महिला नेत्या, हिंडलगा), संतोष कांबळे (समाजसेवक) आणि संतोष शिवणगेकर (समाजसेवक व युवा नेते, जुने बेळगाव) यांच्या हस्ते फाउंडेशनचे उद्घाटन करण्यात आले.

फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट गरजू रुग्णांना दवाखान्यात वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू मोफत स्वरूपात उपलब्ध करून देणे हे आहे. यामध्ये खाट (बेड), व्हीलचेअर, वॉकर, कमोड चेअर यांसह इतर आवश्यक वैद्यकीय साहित्याचा समावेश असून, रुग्णांना या वस्तू घरच्या घरी मोफत वापरण्यासाठी देण्यात येणार आहेत.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष थाबाजी रामलिंग शिंदे, उपाध्यक्षा सौ. संगीता व्ही. शिंदे, सचिव वि. व्ही. शिंदे, खजिनदार सौ. कविता था. शिंदे तसेच संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.

समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत फाउंडेशनच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

आदित्यराज कॅपिटल प्रा. लि.वर धाड; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू

Spread the love  बेळगाव : ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपांवरून बेळगाव शहरातील भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *