बेंगळूर : कोरोना रुग्णांची संख्या काही राज्यांमध्ये पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी काय काय तयारी करण्यात आली याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत डिजीटल माध्यमातून बैठक घेतली आहे. यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पाही सहभागी झाले होते.
यावेळी येडियुराप्पा यांनी पंतप्रधान मोदींकडे महिन्याला 1.5 कोटी लसीचे डोस देण्याची मागणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींना कोविड लसीचे दरमहा दीड कोटी डोस द्यावे, अशी विनंती केली. येडियुराप्पा यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आभासी बैठकीत लसींची मागणी मांडली, असे त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पंतप्रधानांनी सहा राज्यांच्या म्हणजेच महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिसा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मोदींनी तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन चिंता व्यक्त केली. कोरोना परिस्थिती नियोजनासंदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली.
Check Also
बिम्स रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू
Spread the love बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आणखी एका बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे …