बंगळूर : कोरोना संसर्गामुळे रद्द झालेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षेचा निकाल 20 जुलै रोजी राहीर करण्यात येणार आहे. पदवीपूर्व परीक्षामंडळाने निकाल जाहीर करण्याची तयारी केली आहे.
पीयूसी बोर्डाच्या संचालिका स्नेहल यांनी 20 जुलै रोजी बारावीचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला जाईल असे सांगितले.
निकाल 20 जुलै रोजी विभागाच्या वेबसाईटवर प्रकाशित केला जाईल. परीक्षा मंडळाने श्रेणीऐवजी गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुणांसह निकाल जाहीर केले जातील.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी क्रमांक मिळविला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी विभागाच्या वेबसाईटवरील ज्ञपेु ाू ीशसळीीींरींळेप र्पीालशी यावर क्लिक करून नोंदणी क्रमांक मिळवू शकेल. आजपासून ही लिंक खुली होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पीयूसी बोर्ड विद्यार्थ्याच्या ईमेल आणि मोबाईलवर एक लिंक पाठवेल.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बारावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी (प्रथम पीयूसी) वार्षिक परीक्षेमध्ये प्राप्त झालेले 45 टक्के आणि दहावी परीक्षेतील 45 टक्के व 10 टक्के अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल प्रकाशित करेल. निकालावर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्याना परीक्षा मंडळ पुन्हा परीक्षा लिहिण्यास परवानगी देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Check Also
राज्यातील ११ अधिकाऱ्यांच्या ४० ठिकाणावर लोकायुक्त छापे
Spread the love महत्वाची कागदपत्रे, मालमत्ता, मौल्यवान वस्तू ताब्यात बंगळूर : कर्नाटक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंगळवारी …