Monday , September 21 2026
Breaking News

विद्यार्थ्यांना आता सुती मिक्स कापडाचे गणवेश

Spread the love

 

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रारंभ

निपाणी (‌ वार्ता) : समग्र शिक्षण अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी गणवेशाच्या दर्जाबाबत तक्रारी असल्याने शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पॉलिस्टर ऐवजी सुती मिक्स कापडाचे गणवेश देण्यात येत आहेत. सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत गणवेश योजनेत राज्य शासनाने बदल केले आहेत. आगामी २०२६-२७ या आगामी शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेशाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकातून समाधान व्यक्त होत आहे.
नवीन शासन निर्णयानुसार, आता गणवेशाचे कापड १०० टक्के पॉलिस्टर असणार नाही. विद्यार्थ्यांच्या शरीराला किंवा त्वचेला इजा होणार नाही अशा किमान ७०:३० किंवा ८०:२० पॉलिस्टर व कॉटन/व्हिस्कोस मिश्रित चांगल्या दर्जाच्या कापडाचाच वापर केला आहे. विशेष बाब म्हणजे, जर गणवेशाचे कापड निकृष्ट दर्जाचे आढळले, तर संबंधित कापड पुरवठादार आणि शाळा व्यवस्थापन समितीवर कायदेशीर कारवाईचा इशारा निर्णयात दिला आहे.
गणवेशापैकी एक गणवेश प्राधान्यक्रमाने ‘स्काऊट आगि गाइड’ या विषयाला अनुरुप असावा. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळी हाफ पॅन्ट, तर मुलीसाठी आकाशी शर्ट व गडद निळा स्कर्ट/पिनी फ्रॉक किया सलवार-कमीज अशी रचना निश्चित केली आहे. शाळा व्यवस्थापन केंद्रप्रमुखांना १०० टक्के शाळांची, गटशिक्षणाधिकाऱ्यांना ३०% तर प्राथमिक शिक्षणाधिका-यांना प्रत्येक तालुक्यातील किमान १० शाळांची प्रत्यक्ष तपासणी करावी लागेल. संशयास्पद कापडाचे नमुने तत्काळ तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.
——————————————————————
शाळेचा पहिला दिवस पुस्तक आणि गणवेश दिन म्हणून साजरा झाला. अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी केवळ काही विद्यार्थ्यांचे फोटोसेशन पुरते गणवेश वाटप केले जातात, काही दिवसानंतर विद्यार्थ्यांना विलंबाने गणवेश मिळतात, अशी बाब यंदा घडणार नाही. याची काळजी घेण्यात आली आहे.’
महादेवी नाईक, गटशिक्षणाधिकारी, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *