Sunday , July 26 2026
Breaking News

भ्रष्ट कर्मचाऱ्याची बदली न केल्यास नगरपालिकेसमोर उपोषण

Spread the love

 

आयुक्तांना दिले निवेदन; उतारे देण्यासाठी रकमेची मागणी

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिकेतील कार विभागामधील कर्मचारी राहुल कदम हे कराच्या रकमेची अधिक रक्कम मागणी करीत आहेत ती रक्कम दिलेल्या नागरिकांनाच उतारे व इतर कागदपत्रे देत आहेत. याशिवाय एजंटातर्फे येणाऱ्या नागरिकांना तात्काळ उतारे दिली जात आहेत. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचे आठवड्याभरात बदली करावी. अन्यथा येत्या सोमवारी नगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन अभियंते विवेक जोशी यांना नगरसेवक विलास गाडीवडर, मैनुद्दीन मुल्ला यांच्या हस्ते देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, तर विभागातील अधिकारी कदम हे गेल्या काही वर्षांपासून उताऱ्यासाठी दहा हजारापेक्षा अधिक रकमेची मागणी करीत आहेत. इतकी मोठी रक्कम सर्वसामान्य कुटुंबांना देणे अशक्य आहे. रक्कम न दिल्यास उतारे देण्यास विलंब करण्यात येत आहे. या उलट मध्यस्थतर्फे आल्यास एकाच दिवसात उतारे दिले जात आहेत.
याशिवाय नवीन सॉफ्टवेअर आल्याचे कारण पुढे करून उतारे नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत वास्तव्य असलेल्या एका महिलेने दोन महिन्यापासून उताऱ्यांची मागणी केली आहे. त्यासाठी संबंधित महिलेकडून त्या अधिकाऱ्याने १२ हजार रुपयाची मागणी केली आहे. तसेच या अधिकाऱ्याच्या विरुद्ध लोकायुक्त मध्ये दोन वेळा तक्रारी करण्यात आले आहेत. पण एकदाही त्याची चौकशी झालेली नाही. या मागील गौड बंगाल काय? असा प्रश्नही निवेदनात विचारला आहे. तरी आठवडाभरात या अधिकाऱ्याची बदली करून नागरिकांची कामे त्वरित व्हावीत अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी विकास चव्हाण, सुनील शेलार, अल्लाबक्ष बागवान, बक्तीयार कोल्हापुरे, नाविद देसाई, अनिल भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *