Monday , September 21 2026
Breaking News

बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Spread the love

 

बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करत उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले.
स्वागत समारंभासाठी प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, शिक्षकवृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी सौ. कुसुम चौगुले यांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर बालवीर अर्बनचे उपाध्यक्ष राजू मुजावर, संचालक परशराम झगरूचे, पुंडलिक सुतार, दशरथ पाऊसकर आणि अर्जुन चौगुले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. बालवीर अर्बनचे अध्यक्ष आनंदा जाधव व संयोजक शंकर चौगुले यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री सांगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोविंद गावडे यांनी केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *