खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील रूमेवाडी क्राॅसजवळ शिरशीहून बेळगावकडे जाणाऱ्या बसला आडवून ड्रायव्हरला मारहाण करून रक्तबंबाळ केले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरशीहून बेळगावकडे जाणारी शिरशी- बेळगाव बस खानापूर शहराजवळील रूमेवाडी क्राॅसजवळ आली असता मागुन आलेल्या कारमधुन काही युवकांनी बस थांबवुन ड्रायव्हरला मारहाण केली. यात त्याच्या नाकाला जबर मारहाण झाल्याने रक्तबंबाळ झाले. सदर बस ड्रायव्हर मारूती सुर्यकांत कुंभार राहणार गर्लगुंजी गावचा असुन त्याने खानापूर पोलिस स्थानकात युवकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंद करून बस ड्रायव्हरला उपचारासाठी बेळगावला पाठविले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Check Also
राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्काराचा उद्या वितरण समारंभ
Spread the love बेळगाव : थोर समाजसुधारक राष्ट्रवीरकार शामराव देसाई स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नेते, साहित्यिक …