Sunday , July 26 2026
Breaking News

आयजीपी संदीप पाटील यांचा वकिलांकडून सत्कार

Spread the love

 

बेळगाव : उत्तर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) पदावर नियुक्ती झाल्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांचा बेळगाव येथील वकिलांकडून सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित वकिलांनी संदीप पाटील यांच्या कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि जनाभिमुख कार्यपद्धतीचा गौरव केला. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना संदीप पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावना व्यक्त करताना, पोलीस व न्यायव्यवस्था यांच्यातील समन्वय समाजात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. भविष्यातही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रभावी पोलीस प्रशासनासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बेळगाव वकील संघाचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. अण्णासाहेब घोरपडे, अ‍ॅड. आर. पी. पाटील, अ‍ॅड. एन. आर. लातूर, अ‍ॅड. मारुती कामाण्णाचे, अ‍ॅड. राजू हिरेमठ, अ‍ॅड. विनोद पाटील, अ‍ॅड. निंगाप्पा मस्ती, अ‍ॅड. मोहिते, अ‍ॅड. महेंद्र कांबळे, अ‍ॅड. विभूतीमठ, अ‍ॅड. राजेंद्र नलवडे, अ‍ॅड. एम बी बोंद्रे यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते. उपस्थितांनी संदीप पाटील यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *