बजरंग दलची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : हिंदू धर्मियांची अस्मिता असलेल्या गो मातेची हत्या इतर धर्मियांकडून बकरी ईदच्या निमित्ताने केली जाते त्यांच्यावर कारवाई करावी व असे प्रकार थांबवण्यासाठी तसेच गोमातेचे रक्षण करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीने तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुका विश्व हिंदू परिषद अध्यक्ष श्री. गोविंदराव किरमीटे, तालुका बजरंग दल प्रमुख नंदकुमार निट्टूरकर, शहर प्रमुख अमोल पूर्वी, निलेश आलवणे, जानबा शिंदे, गौरव पाटील, अनिकेत गावडे, माऊली पाटील, राम आलावणे, रावजी मोटर, सुनील अथणीकर, किरण अष्टेकर, विश्वनाथ पाटील, मंजुनाथ दंगल, विनायक कट्टी, अजय अष्टेकर व इतर बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …