Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!

Spread the love

 

खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय

खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 व 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या शतकपूर्ती निमित्त आयोजित अधिवेशनाला खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय आज शुक्रवारी खानापूर येथील शिवस्मारकात झालेल्या खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूरचे प्रभारी व काँग्रेस नेते पारिश जैन होते. प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्ष महंतेश राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले, 1924 मध्ये बेळगाव येथे काँग्रेसचे पहिले अधिवेशन महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली भरले होते. त्याला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत हा आमच्या बेळगाव जिल्ह्याचा स्वाभिमान आहे. या शतकपूर्ती अधिवेशनाची आठवण म्हणून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या 26 व 27 रोजी बेळगाव येथे भव्य असे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनला राष्ट्रीय नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यासह अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी खानापूर तालुक्यातील जास्तीतजास्त कार्यकर्त्यांनी अधिवेशनाला उपस्थित राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना प्रभारी पारिश जैन आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगून या कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सुचित केले. यावेळी व्यासपीठावरून केपीसीसी सदस्य महादेव कोळी, चंबाना होसमनी, जॉकी फर्नांडिस, गौसलाल पटेल, कशिम हट्टीहोली, महीला अध्यक्ष दीपा पाटील, सावित्री मादार, वैष्णवी पाटील, अनिता दंडगल, निरुपती कांबळे, प्रकाश मादार, लायकआली बिचनावर, राजेंद्र कब्बुर, अभिषेक होसमनी यासह अनेक जण उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *