बेळगाव : आषाढी एकादशी म्हणजे भारतातील वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा सण. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस. लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. याचेच औचित्य साधून बेळगावच्या महिलांसाठी तारांगण व वैशाली स्टोन क्रशर यांच्यावतीने ऑनलाईन नादब्रह्म भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व सामान्य महिलेने आत्मविश्वासाने पुढे यावे हा उद्देश ठेवून तारांगण ही संस्था कार्य करते. कोरोनाच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ शकत नाही म्हणून ऑनलाईन भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेचे नियम:
१) सीमा भागातील सर्व महिलांसाठी ही स्पर्धा आहे.
२) ४ किंवा ५ महिलांचा समूह असावा. वादक सहित ६ ते ७ व्यक्तींचा सहभाग असावा.
३) एक अभंग किंवा एक गवळण मराठीत सादर करावी.
४) अभंग अथवा गवळण पारंपरिक असावी.
५) वेशभूषा व योग्य सादरीकरण असावे.
६) स्पर्धकांनी ५ मिनिटांचा भजनाचा व्हिडिओ करून दिनांक ३१ जुलै २०२१ पर्यंत पाठवणेचा आहे.
७) प्रवेश शुल्क रु.१००/- फक्त.
८) स्पर्धकांनी आपल्या भजनी मंडळाचे नाव, स्पर्धकांची नावे, पत्ता,फोन नंबर , व्हिडिओ ,प्रवेश शुल्क फोन पे किंवा गुगल पे द्वारे ९३४१४१११८६ व ९८४५८८३८५३ या क्रमांकावर पाठवावे.
९) परीक्षकांच्या निर्णय अंतिम राहील
स्पर्धेचे प्रायोजक कंग्राळीतील वैशाली स्टोन क्रशरच्या संचालिका व भाग्योदय सोसायटीच्या अध्यक्षा रुक्मिणी निलजकर या आहेत. गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य केले आहे. बचत गट व भजनी मंडळाची त्यांनी स्थापना केली आहे. भाग्योदय सोसायटीच्या माध्यमातून महिलांना कर्ज देऊन छोटे उद्योग उभारण्यासाठी मदत केली आहे. गरजू विध्यार्थ्यांना त्यांनी मदत केली आहे..