Friday , April 10 2026
Breaking News

स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बेकवाडात कचरा बकेट वितरण

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्राम पंचायतीच्यावतीने प्रत्येक घरी ओला व सुका कचरा निर्मूलनसाठी बकेटचे वितरण करण्यात आले.
ही योजना भारत सरकार कर्नाटक सरकार यांच्यावतीने स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बेकवाड ग्राम पंचायत क्षेत्रात बेकवाड गायरानमध्ये पाच एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या जागेमध्ये कचरा डेपो बांधण्यासाठी वीस लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे आठ लाख रुपये पाच एकर जमीनीची हद्द कारणासाठी दोन लाख रुपये झाडे लावण्यासाठी असा तीस लाख रुपयाचा फंड मंजूर केला आहे व हा कचरा गोळा करण्यासाठी एसएलडब्लूएम योजनेअंतर्गत 2040 बकेटचे वितरण करण्यात आले. हा कचरा गोळा करण्यासाठी 15 व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत पाच लाख रुपये कचरा गाडीची खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला ग्राम पंचायत विकास अधिकारी नागप्पा बने, अध्यक्ष यल्लापा गुरव, ग्राम पंचायत समितीचे सदस्य वाडकर, संजय कोलकार, गजानन पाटील, परशराम मंडवळकर, नामदेव कोलेकर, गुणवंती तालावर, गुणवंती तळवार, शबाना मुजावर, मोहिनी येळ्ळूरकर, ज्योती गुरव, नूतन भुजगुरव गंगू हळब व गावातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना तीन वर्षे कारावास

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *