खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मिलीग्रीज चर्चला पोलिसस्थानकाचे पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे तसेच पोलिस उपनिरीक्षक सरनेश जलिहाल यांनी नुकताच भेट दिली.
यावेळी भाजपचे तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष जाॅर्डन गोन्सालवीस यानी मान्यवरांचा परिचय करून दिला.
यावेळी फादर कुद्रास लिमा एस जे, पॅरिस प्रिस्ट, फादर ऍन्थोनी, सिस्टर परेसिला, सिस्टर दिव्या, सिस्टर सबिथा, सिस्टर फ्लोरा, सिस्टर मेबल उपस्थित होते.
यावेळी पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे, उपनिरीक्षक सरनेश जलिहाल यांचा मिलीग्रीज चर्चच्यावतीने शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे म्हणाले की, मिलीग्रीज चर्च परिसरातील वातावरण प्रसन्न आहे. याबद्दल मला खूप समाधान वाटले. येथील शिक्षण पध्दतही चांगली आहे. संस्थेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढील पाऊले उचलुन गरीब विद्यार्थी वर्गाचे भविष्य उज्वल करावे अशी इच्छा व्यक्त केली.
- प्रतिक्रिया
तालुक्यातील पहिलेच पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे व उपनिरीक्षक सरनेश जलिहाल यांनी मिलीग्रीज चर्चला भेट दिली. येथील माहिती जाणून घेतली. संस्थेला शुभेच्छा देऊ केल्या. त्यामुळे ख्रिश्चन बांधवांकडून त्यांचे आभार मानले. -जाॅर्डन गोन्सालवीस, भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष खानापूर.