Thursday , December 26 2024
Breaking News

तीन महिन्यानंतरही 44 टक्के पुस्तके उपलब्ध

Spread the love

पुस्तकाविनाच विद्यार्थ्यांचा अभ्यास : स्थानिक शाळांनाच पुस्तके वाटप
निपाणी : कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुमारे दीड वर्षांनी शाळा सुरु झाल्या आहेत. सध्या पाचवी ते दहावीपर्यंतचे नियमित वर्ग सध्या सुरु झाले आहेत. शाळा सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला असला तरी केवळ 44 टक्के पुस्तक उपलब्ध झाले आहेत. असे असले तरी अद्याप 56 टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षाच लागली असल्याचे चित्र निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यक्षेत्रात दिसत आहे. त्यामुळे पुस्तकाविना विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे असा प्रश्न शिक्षकांना तर शिक्षण कसे घ्यायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. निपाणी शैक्षणिक तालुक्यात आतापर्यंत केवळ 44 टक्के पाठ्यपुस्तके दाखल झाली आहेत. शहरातील काही माध्यमिक शाळा आणि श्रीपेवाडी येथील माध्यमिक शाळा वगळता इतर ग्रामीण भागात अद्याप त्याचे वितरण सुरू करण्यात आलेले नाही. येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार निपाणी शैक्षणिक तालुक्यात एकूण 3 लाख 357 इतक्या मोफत पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1 लाख 82 हजार 352 पुस्तके दाखल झाली आहेत. तसेच खाजगी शाळांसाठी पुस्तके विकत दिल्या जाणार्‍या 50 हजार 209 इतक्या पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 17 हजार 324 पुस्तके दाखल झाली आहेत. एकूण 3 लाख 50 हजार 566 इतक्या पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 27 हजार 310 म्हणजेच केवळ 44 टक्के इतकी पुस्तके दाखल झाली आहेत.
गेली दीड वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या. अशातच गेल्यावर्षी थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आल्यामुळे नवी पुस्तके छापण्याची वेळ आली नाही. यंदा देखील कोरोनाची दुसरी लाट कमी-जास्त प्रमाणात असल्यामुळे कर्नाटक राज्यात लॉकडाऊन झाले होते. त्यामुळे पुन्हा शाळा कधी सुरु होतील, याबाबत साशंकता होती. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार टप्प्याटप्प्याने शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर पुस्तके छापली जात आहेत. त्यानुसार निपाणी विभागात आतापर्यंत 44 टक्के पुस्तके दाखल झाली आहेत. तर छपाईच्या ठिकाणी 90टक्के पुस्तके छापली आहेत. उर्वरित पुस्तके आल्यानंतर ती वितरित करण्याचे नियोजन गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त निपाणी चर्चमध्ये विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील कोल्हापूर वेसवर असलेल्या बागेवाडी कॉलेजसमोरील चर्चमध्ये बुधवारी (ता. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *