बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव जिल्हा शाखा, जिल्हा प्रशासन, जिल्हा वैद्यकीय खाते तसेच तालुका वैद्यकीय खात्यातर्फे शहर परिसरातील विविध 18 खासगी रुग्णालयांत शुक्रवारी दि. 17 रोजी मोफत कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेचे सचिव व कॉलेज रोड येथील श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे संचालक डॉ. देवेगौडा आय. यांनी दिली. ते म्हणाले, आयएमएचे बेळगाव शाखा अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, खजिनदार डॉ. रवींद्र अनगोळ, डॉ. मिलिंद हलगेकर, डॉ. राजश्री अनगोळ, डॉ. स्वप्ना महाजन यांच्यासह सरकारी वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्यातून सदर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी दि. 17 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत एकूण 18 रुग्णालयांमध्ये शिबिर होईल, असे कळविण्यात आले आहे.
कसबेकर मेटगुड हॉस्पिटल (शिवाजीनगर), वेणुग्राम हॉस्पिटल (तिसरे रेल्वे गेट), श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर (गांधी भवन, हॉटेल सन्मानच्या मागे, कॉलेज रोड), डेक्कन मेडिकल सेंटर (रेल्वे ओव्हरब्रिज, शास्त्रीनगर), व्हिनस हॉस्पिटल (महात्मा फुले रोड, शहापूर), स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (शिवबसवनगर), लाईफलाईन हॉस्पिटल (अनगोळ, मेन रोड), यश हॉस्पिटल (महाद्वार रोड, शहापूर), भाटे हॉस्पिटल (बिम्ससमोर, केएलई सेंच्युरी चॅरिटेबल हॉस्पिटल (येळळूर रोड), बीएचएस लेक व्ह्यू हॉस्पिटल (गांधीनगर), लाईफ केअर हॉस्पिटल (दरबार गल्ली), श्री साई हॉस्पिटल (वडगाव), लोटस हॉस्पिटल (मंडोळी रोड, टिळकवाडी), अपूर्वा हॉस्पिटल (शिवाजी गार्डन, शहापूर), विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर (अयोध्यानगर), धन्वंतरी हॉस्पिटल (सुभाषनगर, एसपी ऑफिसजवळ) बीएचएस लेक व्ह्यू हॉस्पिटल (गोवावेस) याठिकाणी मोफत शिबिर होणार आहे. गरजूंनी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत सबंधित रुग्णालयाच्या प्रशासनाची संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
