बेळगाव : येत्या दि. 17 सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने भाजपतर्फे विशेष सेवा आणि समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राज्य प्रवक्ते अॅड. एम. बी. जिरली यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान होणार आहे. यामध्ये देशासाठी सेवा समर्पण मोहीम राबविण्याची योजना आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहभागातून देशाचा विकास साधण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर, असे उपक्रम होणार आहेत. त्याचबरोबर देशभरातून पाच कोटी पोस्टकार्डांचे माध्यम वापरून देशासाठी आपण काय करणार आहोत, याची माहिती पंतप्रधानांना देण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी नगरसेवक गिरीश धोंगडी, हणमंत कोंगाडी व शरद पाटील आदी उपस्थित होते.
