पोलिसांची मध्यस्ती : अधिकारी शेतकरी यांच्यात होणार बैठक
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रस्ता रुंदीकरण होणार आहे. त्याचबरोबर कोगनोळी येथील फाट्यावर उड्डाणपूल होणार आहे. या उड्डाणपुलामध्ये येथील शेतकर्यांची सुपीक जमीन जाणार आहे. येथील शेतकर्यांनी येथील उड्डाणपूल व अतिरिक्त जमीन संपादनाला विरोध दर्शवला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांना दिले आहेत.
सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून येथील जमीनचा सर्वे करण्याचे काम सुरू झाल्याने आक्रमक झालेल्या रयत संघटनेच्या शेतकर्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश व्ही. शिवयोगी यांनी संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना बोलावून घेऊन शेतकरी व अधिकारी यांची बैठक घेतली.
या बैठकीमध्ये शेतकर्यांनी जोपर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत सर्वे बंद करण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी उपस्थित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी वरिष्ठांशी बोलून याठिकाणी सुरू असलेले सर्व्हे बंद करू असे आश्वासन दिले.
यावेळी शेतकर्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी रस्ता रुंदीकरणाच्या विषयावर शेतकर्यांचे होणारे नुकसान याविषयी माहिती दिली. येणार्या काळामध्ये शेतकर्यांना सोडून कोणताही निर्णय घेऊ नये अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात येईल असा इशारा दिला.
या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बेळगाव कार्यालयाचे व्यवस्थापक एस. एम. नाईक, कलमेश गुडीमनी, विठ्ठल मोरे यांच्यासह निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार, कोगनोळी पोलीस स्टेशनचे एएसआय एस. ए. टोलगी, संजय काडगौडर, राजू गोरखानवर, एस. एम. गाडीवड्डर यांच्यासह अन्य पोलीस उपस्थित होते.
शेतकर्यांच्या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने, संदीप चौगुले, आनंदा पाटील, युवराज माने, बाळासाहेब हादिकर, गब्बर शिरगुप्पे, पुंडलिक माळी, उमेश परीट, नारायण पाटील, मधुकर इंगवले, मन्सूर शेंडूरे, तानाजी जाधव, नागेश पाटील, मुनिर मुल्ला, राजू पाटील, प्रकाश वडर, संतोष चौगुले, विनायक चौगुले, रयत संघटना निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, विवेक जनवाडे, रयत संघटना निपाणी तालुका सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, मलगोंडा मिरजे यांच्यासह शेतकरी, कारखानदार, व्यावसायिक, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत शेंडूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : सरकारने शेतकऱ्यांच्या …