बेळगाव : उत्तर कर्नाटकातील जागृत तसेच कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील आराध्य दैवत असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती येथील श्री रेणुका (यल्लम्मा) देवी मंदिर आज मंगळवारपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
मागील वर्षभरापासून कोरोना काळात देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिराच्या इतिहासात प्रथमच भक्तांना 17 महिने देवीच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे लाखो भाविकांना देवीच्या दर्शनाची आस लागून राहिली होती. मात्र नवरात्रोत्सवापूर्वी रेणुका मंदिर खुले झाल्यामुळे भक्तांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र प्रशासनाने देवदर्शनासाठी काही अटी लादल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने देवीचे दर्शन घेता येणार परंतु अन्य धार्मिक कार्यक्रम घेण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम तसेच इतर विधींना बंदी घालण्यात आली आहे. तसेच सामाजिक अंतर राखून मास्क, सॅनिटायझरचा वापर करूनच देवीचे दर्शन घेता येणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग करूनच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …