कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4वर आरटीओ ऑफिस जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना मंगळवार तारीख 28 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली.
गणेश सुभाष नरके (वय 25) राहणार नंदगांव तालुका करवीर, कोल्हापूर असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोगनोळीपासून जवळ असणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आरटीओ ऑफिस जवळ सेवा रस्त्यावर मयत गणेश नरके मोटरसायकल क्रमांक एमएच 09 ईक्यू 0461 होंडा होर्नेट घेऊन येत होते. याच दरम्यान या ठिकाणाहून जाणार्या अज्ञात वाहनाची त्यांना जोराची धडक बसली. यामध्ये गणेश यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, राजू गोरखनावर, एस. एम. गाडीवड्डर यांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. जय हिंद रोड डेव्हलपर्स कर्मचार्यांनी घटनास्थळावरील अपघातग्रस्त मोटरसायकल व अन्य साहित्य बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला. मयत गणेश नरके यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व नवजात शिशु असा परिवार आहे.
Check Also
महांतेश कवठगीमठ यांना नागनूर रुद्राक्षी मठाचा ‘सेवारत्न पुरस्कार’
Spread the love बेळगाव : कर्नाटक विधान परिषदेचे माजी सदस्य आणि केएलई संस्थेचे संचालक महांतेश …