बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने सेवाही समर्पण या अभियानाअंतर्गत वीस दिवस वेगवेगळे सेवाकार्य सुरू आहेत. यानिमित्ताने उचगाव, सुळगा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर प्रभाकर कोरे के.एल.ई. संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा सदस्य व किसान मोर्चा राज्याध्यक्ष श्री. इरण्णा कडाडी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने झाली. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना इरण्णा कडाडी म्हणाले, जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, भाजपा ग्रामीण मंडळच्यावतीने गेल्या आठ दिवसातील हे तिसरे मोफत आरोग्य तपासणी शिबीर असून या ठिकाणी के.एल.ई. च्या जवळपास सत्तर डॉक्टर आणि नर्स अशी टीम या शिबिरामध्ये काम करत आहे. नाक, कान, घसा, डोळे, त्वचा, हाडे, हृदय अशा वेगळ्या आठ डॉक्टरांच्या टीम या शिबिरामध्ये मोफत तपासणी, औषधोपचार, ऑपरेशन हे सर्व मोफत उपचार केले जाणार आहेत.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, ग्रामीण मंडळच्या वतीने पक्षाने सांगितलेले सर्व कार्यक्रम काटेकोरपणे केले जातात आणि ग्रामीण भागातील जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळू पाटील, अनिल पाटील, तालुका पंचायत सदस्य नारायण कदम, डॉ. सुजाता पाटील, डॉ. आरती दर्शन, डॉ. डांगे, महानगर चिटणीस महांतेश वकुंद, पीडीओ सरिता तुपट व इतर ग्रामस्थ, सदस्य, देवस्थान पंच व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …