बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेच्या श्रेया भातकांडे आणि प्राजक्ता निलजकर या हॉकीपटुंची वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी बेंगलोर येथे होणार्या राज्यस्तरीय शिबिराकरिता निवड झाली आहे.
टिळकवाडी येथील गोगटे कॉलेजच्या विद्यार्थिनी असणार्या श्रेया भातकांडे आणि प्राजक्ता निलजकर या उत्तम हॉकीपटू आहेत. यापूर्वी अनेक हॉकी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी नोंदविणार्या या दोन्ही महिला हॉकीपटुंची आता बेंगलोर येथे येत्या 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणार्या राज्यस्तरीय वरिष्ठ हॉकी शिबिरासाठी निवड झाली आहे. या शिबिरामध्ये झाशी उत्तर प्रदेश येथे होणार्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची निवड केली जाणार आहे.
कर्नाटकचा संघ 16 सप्टेंबर रोजी झांशीला रवाना होणार आहे. राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड झालेल्या श्रेया आणि प्राजक्ता यांना नामांकित हॉकी प्रशिक्षक सुधाकर चाळके यांचे मार्गदर्शन तसेच बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी आणि उपाध्यक्ष पूजा जाधव यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …