कमिशनर उपेंद्र प्रतापसिंग : औद्योगिक वसाहतीला अधिकार्यांच्या भेटी
निपाणी : बोरगावसह परिसरातील टेक्स्टाईल उद्योगांची पाहणी करता येथील समस्या जाणून घेण्यासाठी बेंगलोर कमिशनर उपेंद्र प्रतापसिंग यांच्यासह वस्त्रोद्योग पथकाने औद्योगिक पार्कला धावती भेट दिली. वसाहतीतील उद्योग धंद्याची पाहणी केली असता राज्यातील टेक्सटाईल पार्क पैकी बोरगाव येथील केएसएस आयडीसी अंडरचा टेक्स्टाईल पार्क राज्यात आदर्शवत पार्क आहे, असे गौरवोद्गार कमिशनर उपेंद्र प्रतापसिंग यांनी काढले.
कोरोना आणि महापूर संकटातही औद्योगिक पार्कमधील बहुतांश उद्योगधंदे हे जोमाने सुरू आहेत. हे राज्यात प्रेरणादायी आहेच. शिवाय येणार्या संभाव्य परिस्थितीतहि न डगमगता उद्योजकांनी आपले उद्योगधंदे सुरूच ठेऊन सरकारचे धोरण यशस्वी केले असल्याचेही कमिशनर उपेंद्र प्रतापसिंग यांनी सांगून केएसएस आयडीसी अध्यक्ष शरद जंगटे यांच्या कार्याचेही कौतुक केले. येणार्या काळात लवकरच टेक्स्टाईल पार्कसाठी अत्यावश्यक सेवा देणारे अग्निशामक दल, पोस्ट ऑफिस, लॅबोरेटरी कार्यालय, दवाखाना यासारख्या सेवा लवकरच सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. येथील उद्योगधंद्याची परिस्थिती पाहून सर्वच उद्योग धंद्यांना शासकीय योजनेतून नक्कीच प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले.
कोरोना काळात टेक्स्टाईल उद्योगांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक उद्योग धंदे चालवणे कठीण झाले होते. परिणामी अनेक उद्योग धंद्यावर कर्जाचे डोंगर उभे राहिले आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर टेक्स्टाईल उद्योजकांच्या सर्वच समस्या मार्गी लावण्याबरोबर आवश्यक गरजांची पुर्तता करण्याची मागणी टेक्स्टाईल उद्योग धारकांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रारंभी परिसरात कमिशनर उपेंद्र प्रतापसिंग यांनी वृक्षारोपण केले. दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. संस्थेमार्फत कमिशनर उपेंद्र प्रतापसिंग यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी केएसएस आयडीसी अध्यक्ष शरद जंगटे, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, प्रकाश एस. पी. वासुदेव, दोड्डमनी सी., डी.ई. मल्लिकार्जुन, सतीश कापसे, दिगंबर कांबळे, रमेश घेवारे, रवी कर्यापगोळ, भूपाल महाजन, दिलीप महाजन, प्रकाश पाटील, शंकर पाटील, प्रज्ञावंत यादव, भारती सातपुते, निखिल वड्डर यांच्यासह परिसरातील उद्योजक, टेक्स्टाईल असोशियन कार्यकर्ते उपस्थित होते. राजू खिचडे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल लाटणे यांनी आभार मानले.
Check Also
शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत शेंडूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : सरकारने शेतकऱ्यांच्या …