बेळगाव : आजच्या स्पर्धेच्या युगात ताणतणाव वाढला आहे. तणावाचा वाढता परिणाम प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. वाढत्या ताणतणावामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
अशावेळी सकारात्मक आचार विचारांसाठी प्राणिक हिलिंग महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बेळगाव प्राणिक हिलिंग सेंटरच्या संचालिका सुषमा पाटील यांनी केले आहे.
तृतीय पंथीयांच्या सर्वांगिण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ह्युमेनिटी फाउंडेशनच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात संस्थेच्या सदस्यांना प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज मंगळवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बेळगाव प्राणिक हीलिंग सेंटरच्या संचालिका सुषमा पाटील यांनी उपस्थितांना प्राणिक हिलिंग संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्याच बरोबर प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून शरीरातील सुप्त सकारात्मक उर्जा शक्ती जागृत करणे. जागृत झालेल्या सकारात्मक शक्तीच्या माध्यमातून जीवनात चांगल्या आचार विचारांची कास धरणे. यासंदर्भात मार्गदर्शन केले. विद्युत मैत्राणी यांनी यावेळी समयोचित विचार मांडले.
ह्युमेनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी सावंत, यांच्यासह महेश कदम, मिलिंद पेडणेकर, रतनसिंग व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …