बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती म्हणून रितू राज अवस्थी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज 13 राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्तीवर सही केली. केंद्र सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी आज हे अधिसूचित केले. सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केल्यानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली. अलाहाबादस्थित न्यायमूर्ती रितू राजू अवस्थी यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद कुमार यांची गुजरात राज्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकसह आठ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीची शिफारस केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या कलेक्टिव्हने कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी यांच्या नावाची शिफारस केली आहे. याशिवाय देशातील 13 उच्च न्यायालयांमध्ये नवीन मुख्य न्यायमूर्तींची शिफारस करण्यात आली आहे.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …