बेळगाव : उपचारांसाठी दाखल झालेल्या मुस्लिम रुग्णाच्या नातेवाईकाला एका सुरक्षारक्षकाने तालिबानी असे संबोधून अवमान केल्याची घटना बेळगावात केएलई इस्पितळात घडली. रुग्णाच्या नातेवाईकाला एका सुरक्षारक्षकाने तालिबानी असे संबोधून तालिबान्यांबद्दल माहिती सांग असे म्हटल्याची घटना शनिवारी केएलई इस्पितळात घडली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकाने वाद घालून, मला असे का संबोधले म्हणून आरडाओरड केली. त्यावेळी इस्पितळातील डॉक्टर्सनी हस्तक्षेप करून त्यांचा वाद मिटवला. तयावेळी एम. एन. पाटील नामक या सुरक्षारक्षकाने, ‘माझी चूक झाली, मला माफ कर’ असे सांगत तेथून काढता पाय घेतला. सुरक्षा रक्षकाच्या या वागण्याचा नागरिकांनीही निषेध केला आहे. वेषभूषेवरून कोणाला काही अवमानास्पद बोलणे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटली आहे.
