नवी दिल्ली : ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ (सीपीआय इन्फ्लेशन) 4.35 टक्क्यांवर आल्यामुळे देशाला मोठाच दिलासा मिळाला आहे. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे ही चलनवाढही आटोक्यात राहिली आहे. मागील महिन्यात ही चलनवाढ 5.30 टक्के एवढी होती. या चलनवाढीचा दर घटल्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली आहे. ही चलनवाढ या वर्षीच्या एप्रिल पासून सर्वात कमी नोंदविण्यात आली आहे. मे व जूनमध्ये ही चलनवाढ सहा टक्क्यांवर गेल्यामुळे काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. रिझर्व बँकेच्या आर्थिक धोरण समितीने ठरवून दिलेल्या लक्ष्यानुसारच हा चलनवाढीचा दर असल्यामुळे हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.
गेल्या काही महिन्यात इंधनाचे भाव भडकूनदेखील ही चलनवाढ नियंत्रणात राहिली. अन्नधान्याची चलनवाढ कमी झाल्याने रिटेल इन्फ्लेशनही कमी झाले. ग्राहक अन्नधान्य किंमत चलनवाढीचा निर्देशांक सप्टेंबर महिन्यात 0.68 एवढा होता. ऑगस्ट महिन्यातील हा आकडा 3.11 टक्के एवढा होता. तेथून तो सप्टेंबर महिन्यात तो घसरल्याने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढही कमी झाली. खाद्यान्नाच्या चलनवाढीचा सप्टेंबरचा दर 34.19 टक्के एवढा होता. ऑगस्टमधील 33 टक्क्यावरून हा दर वाढला आहे. भाजीपाल्याच्या किमती वर आधारित चलनवाढ 22.5 एवढी कमी झाली.
उत्पादनही वाढले
राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात औद्योगिक उत्पादन क्षेत्रातही ऑगस्ट महिन्यात 11.9 टक्क्यांनी वाढ झाली. उत्पादन, खाण आणि ऊर्जा क्षेत्रातील चांगल्या कामगिरीचा हा परिणाम असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण उत्पादन क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात 9.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच काळात खाण उत्पादनात 23.6 टक्क्यांनी, तर ऊर्जा क्षेत्रात 16 टक्क्यांनी वाढ झाली.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …