Friday , July 26 2024
Breaking News

मंत्रिपदासाठी आ. रमेश जारकीहोळींची थेट दिल्लीतून फिल्डिंग

Spread the love

बेळगाव : मध्यंतरी काही काळ शांत बसलेल्या गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची कुणकुण लागल्याने त्यांनी आता दिल्ली गाठली आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खबर लागल्याने आ. रमेश जारकीहोळी यांनी दिल्ली गाठली आहे. याआधी हात दिलेले मंत्रिपद येनकेन प्रकारे आता मिळवायचेच या इर्षेने पेटलेल्या रमेश जारकीहोळी यांनी हायकमांडसह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत थेट दिल्लीतून लॉबिंग सुरु केले आहे. याआधी दिलेल्या शब्दाला जागून मंत्रिपद द्या अशी विनंती ते करत आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीत गोकाक मतदारसंघातून भाजपला सर्वाधिक मते मिळवून दिली आहेत. आगामी जि.पं. व ता. पं. निवडणुकांतही भाजपला विजयी करण्याची जबाबदारी माझी असेल, त्याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघात भाजप आमदार निवडून आणेन मंत्रिपद दिल्यास हे सर्व करणे सोपे होईल. त्यामुळे मंत्रिपद द्या अशी विनंती त्यांनी हायकमांड आणि पक्षातील ज्येष्ठ व प्रभावी नेत्यांना केल्याचे समजते.

About Belgaum Varta

Check Also

डॉ. दत्तात्रय देसाई यांचा ‘दस्तक ..अनसुनी आहट’ हा हिंदी कविता संग्रह प्रकाशित

Spread the love  बेळगाव : बेळगावचे सुपत्र डॉ. दत्तात्रय ज्ञानदेव देसाई यांचा पहिला कविता संग्रह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *